अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनासह विविध कारणांनी लांबणीवर पडलेल्या सकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने काल आदेश जारी केला आहे.

त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असून ज्या टप्प्यावर निवडणुका रखडल्या होत्या त्यानुसार आता निवडणुका होणार आहेत. तसेच डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 916 संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 156 संस्थांच्या निवडणूकांचा समावेश आहे.

या निर्णयानुसार, सहकारी साखर कारखाने, बाजार समित्या, सोसायट्या, पतसंस्था, दूध संघ, सहकारी बँकाच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्राधिकरणाने जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांचा दिल्या दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडताना सामाजिक अंतर आखण्यात यावे. मास्कचा वापर आणि थर्मल स्क्रीनिंग अशा उपाययोजनांचा अवलंब करावा असे आदेशात नमूद केले आहे.

काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. आता सरपंच पदाच्या निडणुकाही जाहीर झाल्यात. त्यातब आता सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.

अशोक, अगस्ती कारखाना, बाजार समित्या निवडणुकीचा धुराडा उडणार

या निर्णयानुसार ीरामपुरातील अशोक सहकारी साखर कारखान्याची स्थगित झालेली निवडणूक पुन्हा सुरू होणार आहे. या कारखान्याच्या निवडणुकीचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. या यादीवर हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता या निवडणुकीचा धुराडा उडणार आहे. तसेच %ीरामपूर बाजार समितीच्या पदाधिकार्यांची मुदत संपली असल्याने हीही निवडणूक जाहीर होणार आहे. तसेच काही सहकारी बँका, सोसायट्या, पतसंस्थांच्या निवडणूका होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.