सीमा वादावर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट, त्यामुळे…”

सीमा वादावर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट, त्यामुळे…”

शिर्डी | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Sangli, Jath) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadanvis Government) गंभीर आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आज शिर्डीत मुख्यमंत्री झाल्यावर प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आले होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले तसेच पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमची आहे. कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या गावावर दावा केला आहे, ते सांगलीतील जतमधील गावची मागणी ही 2012 सालची आहे. सीमावाद सामोपचार सोडविण्यावर आमची भर आहे. सीमा वादात आणखी कोणी काही वाद निर्माण करू नये, अस म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला तसेच सध्या सीमा वादाचा प्रत्र न्यायालयीन आहे, अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर आज आगमन झाले. यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ‌. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com