कपड्याच्या दुकानाला आग लावणार्‍याचा शोध सुरू

कपड्याच्या दुकानाला आग लावणार्‍याचा शोध सुरू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोडवरील रुबाब या कपड्याच्या दुकानास आग लावण्याच्या घटनेतील आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

शहरातील संकेत गिरमे यांच्या रुबाब या कापड दुकानास आग लावण्याची घटना सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात प्रथम तक्रार नोंदवूनही पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याने दुकानास दुसर्‍यांदा आग लावण्याच्या प्रयत्न झाला.

श्री. गिरमे दुसर्‍या घटनेची माहिती देण्यासाठी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गेले असता सुट्टीचा वार असल्याचे सांगत पोलिसांनी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली. दुसर्‍यांदा आग लावण्याचा प्रकार सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी गीरमे यांच्याकडून सीसी टीव्ही फुटेज घेतले असून त्यातील व्यक्ती कोण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन्ही वेळेस लागलेल्या आगीत दुकानाचा समोरील भाग जळून खाक झाला असून आतील भागात धूर गेल्याने किंमती कपड्यांना फटका बसला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com