अंतिम सुनावणीपर्यंत 'तो' मोबाईल टॉवर बंद

अंतिम सुनावणीपर्यंत 'तो' मोबाईल टॉवर बंद

अहमदनगर | प्रतिनिधी

शहरातील (Ahmednagar) धर्माधिकारी मळा (Dharmadhikari Mala) येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरला (5G Mobile Tower) स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असताना महापालिकेत (AMC) सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. अंतिम सुनावणी होईपर्यंत मोबाईल टॉवरचे प्रेक्षपण बंद ठेवण्याचे मोबाईल कंपनीला स्पष्ट करण्यात आले.

फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांनादेखील याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याने या टॉवरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.

महापालिकेत झालेल्या सुनावणी प्रसंगी सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांना मोबाईल टॉवरला विरोध असलेल्या ९५ स्थानिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

या बैठकीसाठी जागा मालक प्रमिला कानडे व आनंद कानडे, मोबाईल कंपनीकडून ॲड. विवेक भापकर, तर स्थानिक नागरिकांच्या वतीने अ‍ॅड. कारभारी गवळी, लता बोरा, डॉ. अनिल बोरा, माधवी दांगट, वसुधा शिंदे, ललीता गवळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.