हातावर रुमाल टाकून जनावरांची सौदेबाजीची पद्धत बंद करा

शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने मागणी
हातावर रुमाल टाकून जनावरांची सौदेबाजीची पद्धत बंद करा

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहारात हातावर रुमाल टाकून करण्यात येणारी सौदेबाजीची पद्धत बंद करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोकराव ढगे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे कडे केली आहे.

कृषी मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात डॉ.ढगे यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये गाई, म्हैस, बैल इत्यादी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी अतिशय जुनाट असलेली रूमला पद्धत वापरली जात आहे. हातावर रूमला टाकून जनावरांचा सौदा करणे ही अत्यंत भयंकर आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेवणारी आहे. हातावर रूमाल टाकून दलाल जनावरांचा सौदा करतात त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांची नक्की किंमत किती हे कळत नाही. शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन सौदा केला जात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे या रुमाल पध्दतीवर तातडीने बंदी आणावी अशी मागणी डॉ.ढगे यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना ही पाठविण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यलय पातळीवर परिपत्रक काढून आणि सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करून या रुमाल पध्दतीवर बंदी आणणे बाबद कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com