विद्यार्थाकडून पाच हजाराची लाच घेताना ‘एकता कॉलेज’ चा लिपिक जाळ्यात

विद्यार्थाकडून पाच हजाराची लाच घेताना ‘एकता कॉलेज’ चा लिपिक जाळ्यात

अहमदनगर|Ahmedagar

तृतीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थाकडून फी (Student Fee) व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची लाच (Bribe) घेताना येथील एकता कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समधील (Ekta College of Science and Commerce) लिपिकाला (Clerk) रंगेहाथ पकडण्यात आले. असद युसुफ खान पठाण (वय 42 रा. मुकुंदनगर) असे पकडलेल्या लिपिकाचे (Clerk) नाव आहे. लाचलुचपत विभागाच्या (Bribery Department) नगर पथकाने सोमवारी नगर शहरातील तपोवन रोडवर (Tapowan Road) ही कारवाई केली.

तक्रारदार विद्यार्थी एकता कॉलेज येथे सायन्स द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. त्यांना तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयाकरिता प्रवेश घेण्यासाठी लिपिक (Clerk) पठाण याने प्रवेश फी व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची मागणी (Demand) केली. तक्रारदार यांनी बाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे (Bribery Department) केली होती. त्यावरून सोमवारी एकता कॉलेज येथे लाच (Bribe) मागणी पडताळणी केली असता पठाण याने पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे पाच हजार रूपयांची मागणी (Demand) केली. त्यानंतर तपोवन रोडवरील शिवरत्न चहाचे हॉटेल समोर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची (Bribe) रक्कम पठाण याने पंचासमक्ष स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, हारून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com