पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढ्या-नाल्यांची सफाई सुरू

पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढ्या-नाल्यांची सफाई सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढ्या-नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी ओढ्या-नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी सुरू केली.

यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तवण्यात आला आहे. पडलेल्या पावसाचे पाणी सोईस्करपणे वाहून जावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात उपाययोजना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी भिंगार नाला साफसफाई कामाची पाहणी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केली यावेळी अक्षय कांडेकर, अमोल सानप, बाप्पू आजबे, शरद वनवे, राजू खैरे, विजय खैरे आदी उपस्थित होते.

यावेळी घुले पुढे म्हणाले, शहरातील ओढे नाल्यांची व गटरीची साफसफाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल जर वेळेत साफसफाई झाली नाहीतर नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसून आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व शहरांमध्ये साथीचे आजार पसरू शकतात यासाठी शहरातील ओढे- नाल्यांची व गटारीची साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com