
देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण लिग 2019-2020 मध्ये नगरपरिषदेने देशात 15 वा व देशाच्या पश्चिम विभागातील 6 राज्यांमध्ये आठवा क्रमांक मिळविला आहे. देशात 15 वा क्रमांक प्राप्त केल्यामुळे नगरपरिषदेला 5 कोटींचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
शहरात ओला व सुका कच-याचे वर्गीकरण, प्रत्येक प्रभागात घंटागाडी, खतनिर्मिती प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सुलभ शौचालय, रिकाम्या जागेत वृक्षारोपन असे विविध उपक्रम नगरपरिषदेने हाती घेत ते यशस्वीपणे राबविले आहेत.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पाच राज्यांतील सहभागी नगरपालिका नगरपरिषदांमधून देवळाली नगरपरिषदेने आठवा क्रमांक पटकाविला आहे.
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात सात्यताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी नागरिकांबरोबरच सामाजिक,शैक्षणिक,सहकारी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभते. याबद्दल मी पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांचे व नागरिकांचे अभिनंदन करतो. सर्व शहरवासियांच्या सहकार्यामुळे व मेालाची मदत दिल्याने हा सन्मान प्राप्त झाला आहे.
- सत्यजित कदम
नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतील अधिकारी/कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तसेच यापुढेही भविष्यातही नगरपरिषद आपल्या कार्याचा ठसा देशपातळीवर उमटविल.
- अजित निकत, मुख्याधिकारी