कॅडल मार्च काढून जिल्हा रूग्णालयातील मृतांना श्रद्धांजली

कॅडल मार्च काढून जिल्हा रूग्णालयातील मृतांना श्रद्धांजली

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा रूग्णालयातील (Civil Hospital) करोना अतिदक्षता विभागाला (Intensive care Unit) लागलेल्या आगीत 11 रूग्णांचा मृत्यू (Pateint Death) झाला. त्या मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांनी रविवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालय परिसरात कॅडल मार्च (Candle March) काढून अभिवादन केेले. यावेळी जिल्हा रूग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी सहभागी झाले होते.

जिल्हा रूग्णालयातील (Civil Hospital) करोना अतिदक्षता विभागाला (Corona Intensive care Unit) लागलेल्या आगीत मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण (Tribute) करण्यासाठी रविवारी सायंकाळी रूग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी मेन गेटसमोर एकत्र जमले होते. पेटलेले दिवे हातात घेऊन कॅडल मार्च (Candle March) काढण्यात आला. जळीत अतिदक्षता विभागाच्या ठिकाणी जाऊन मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण (Tribute) करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com