14 व्या मृत्यूनंतरही चौकशी सुरूच

जिल्हा रूग्णालय अग्नितांडव: 17 दिवसानंतरही अहवाल नाही
14 व्या मृत्यूनंतरही चौकशी सुरूच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयातील आगीत (Civil Hospital Fire Case) जखमी (Injured) झालेल्या आणखी एका रूग्णाचा सोमवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू (Patient Death during treatment) झाला. रंभाबाई अंजाराम विधाते (वय 80 रा. बाभूळखेडा ता. नेवासा) असे या रूग्णाचे नाव आहे. रंभाबाई यांच्यावर खासगी रूग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू होते.

जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला (Intensive Care Unit at District Hospital) 6 नोव्हेंबरला आग (Fire) लागली होती. त्यावेळी विभागात करोनाचे 17 रूग्ण उपचार घेत होते. आगीच्या घटनेच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू (Death) झाला. त्यानंतर घटनेतील इतर रूग्णांना खासगी रूग्णालयात (Private Hospital) हलविण्यात आले. त्यात एका खासगी रूग्णालयात (Private Hospital) दाखल असलेल्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्या तिघांपैकी सोमवारी दुपारी रंभाबाई यांचा मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेत मृतांची संख्या आता 14 झाली आहे.

दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील आगप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सात दिवसांत चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल, असे सांगितले होते. परंतु घटना होऊन 17 दिवस झाले, तरी चौकशी सुरूच आहे. राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समिती यासंदर्भातील बैठका (Meeting) आता, नगर येथे होत नाहीत. नाशिक येथे बैठका होतात. चौकशी समितीने मुख्य विद्युत निरीक्षकांना चौकशी अहवाल (Inquiry report to Chief Electrical Inspector) मागितला होता. तो अहवाल चौकशी समितीसमोर सादर झाला आहे. परंतु दाखल गुन्ह्यात पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे चौकशी समिती आणि दाखल गुन्ह्याच्या तपासात नेमके पुढे काय होते याकडे आता लक्ष लागले आहे.

पोलिसांनी नोंदविले नातेवाईकांचे जबाब

जिल्हा रूग्णालयातील आग प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक वैद्यकीय अधिकारी, तीन कर्मचार्‍यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. दरम्यान या गुन्ह्यात पुढील तपास मुख्य विद्युत निरीक्षकांच्या अहवाल आल्यानंतर होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून सध्या जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. आग लागली त्यावेळी प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसह आगीत जखमी झालेल्यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com