शहरात विनाकारण फिरणार्‍यांची रस्त्यातच अँटीजेन चाचणी

शहरात विनाकारण फिरणार्‍यांची रस्त्यातच अँटीजेन चाचणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरामध्ये संचारबंदी काळात विनाकारण फिरणार्‍यांची शहर पोलीस व मनपा पथकाकडून रस्त्यावर अँटीजेन चाचणी केली जात आहे. त्यासाठी पत्रकार चौक व डिएसपी चौकात केंद्र सुरू केले आहे. पत्रकार चौकातील केंद्रावर शनिवारी सायंकाळी या चाचणीला सुरूवात करण्यात आली तर डिएसपी चौकात रविवारी अँटीजेन चाचणीला सुरूवात झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची चाचणी करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याबाबतचे आदेश दिले होते. यानुसार मनपातर्फे शहरात दोन ठिकाणी अँटीजेन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रावर मनपा कर्मचार्‍यांसह पोलीसही तैनात करण्यात आले आहे. या केंद्रावर एक तंत्रज्ञ व एक डाटा ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहे. नगर शहर व नगरमध्ये ग्रामीण भागातून आलेल्यांची चाचणी येथे करण्यात येत आहे. या केंद्रावर एक रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. ज्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला त्यांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com