नगर शहरात तिघांची आत्महत्या

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात रविवारी एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. यामध्ये दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. कावेरी राहुल राजपूत (वय 17, रा. केडगाव, ता. नगर) हिने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गौरी एकनाथ शिंदे (वय 15, रा. मिसाळ गल्ली, तेलीखुंट, अहमदनगर) हिने राहत्या घरी स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभय मनोज हरिश्चंद्रे (वय 17, रा. भिस्तबाग चौक, सावेडी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com