विधान परिषदेवर विक्रम राठोड यांची नियुक्ती करा

 विक्रम राठोड
विक्रम राठोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना राज्यपाल कोट्यातून दिल्या जाणार्‍या आमदारकीच्या जागेतून संधी द्यावी,

अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, सर्व नगरसेवकांनी पत्राद्वारे केली आहे.

शिवसेनेचे उपनेते (स्व.) अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गेली 40 वर्षे शिवसेनेचे कार्य वाढवण्यासाठी आहोरात्र मेहनत घेतली. शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी 40 वर्षे योगदान दिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन त्यांनी समाजकारण व राजकारण यांची सांगड घालून अनेक विकासकामे शहरामध्ये केली आहेत.

विक्रम राठोड हे सुद्धा गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेच्या कार्यामध्ये आहेत. पक्ष संघटना वाढवणे, विद्यार्थी सेनेचे काम ते पक्षाचा माद्यमातून करत आहेत. सध्या ते युवासेनेचे जिल्हा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कै. अनिल राठोड यांच्या निधनामुळे नगर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विक्रम राठोड यांना आमदारकीची संधी द्यावी, जेणेकरून पक्षाचा आलेख वाढत जाईल. त्यासाठी त्यांचा जरूर विचार करावा व त्यांना या माध्यमातून संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com