संगमनेरात 11 गोवंश जनावरांना जीवदान

संगमनेरात 11 गोवंश जनावरांना जीवदान

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

राज्यात गोहत्या बंदी कायदा (Cow slaughter ban law in the state) अस्तित्वात असतानाही संगमनेरात (Sangmner) मात्र गोवंशाचे जातीच्या जनावरांची खुलेआम कत्तल सुरूच (Slaughter continues) असल्याचे काल पुन्हा स्पष्ट झाले आहे. शहरातील भारत नगर परिसरात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 11 जनावरांची शहर पोलिसांनी बुधवारी रात्री 10.30 वाजता मुक्तता केली आहे. (City police release 11 animals)

याबाबत शहर पोलिसांकडून (Sangmner City Police) समजलेली माहिती अशी की, शहरातील भारतनगर परिसरात मुस्तफा अहमद कुरेशी याने 10 वासरे आणि 1 गाय असे 11 गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाड्यात बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास छापा टाकला असता 1 लाख 25 हजार रुपयांची जनावरे (Animals) आढळली. पोलिसांनी या जनावरांचा पंचनामा करून जनावरांची सुटका केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मुस्तफा कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. पुढील तपास हवालदार रफीक शेख हे करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com