राष्ट्रवादी भवनावर नगर पोलिसांचा पहारा

राष्ट्रवादी भवनावर नगर पोलिसांचा पहारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर येथील राष्ट्रवादी भवनाला पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. शनिवारी 6 जणांच्या पोलिसांची टीम भवनावर पोहचली आहे. सध्या शरद पवार व अजित पवार यांच्यात पक्षावरील ताब्यावरून राजकीय वाद सुरू आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांकडून पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादीची कार्यालये राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या मालिकीची असून या ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी भवनांचा ताबा त्यांच्याकडे राहणार, हे स्पष्ट झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com