श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध भागात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले आहे अशा भुरट्या चोरांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा.

या मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरवुडे यांना दिले आहे.

गोंधवणी व शहरातील इतर भागांमध्ये मोटारसायकल व इतर छोट्या-मोठ्या चोर्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, असे असताना त्या भागातील पोलीस कर्मचारी दिवसा व रात्री गस्त घालताना दिसून येत नाहीत. यामुळे छोट्या-मोठ्या चोर्या करणार्या भुरट्या चोरांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. चोरी केलेल्या मोटारसायकल सापडत नसल्यास त्या भागातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना जवाबदार धरून त्यांचेविरुध्द देखील कर्तव्यात कसूर केले म्हणून कारवाई करण्यात यावी.

आमच्या निवेदनाची दखल घेऊन भुरट्या चोरांचा बंदोबस्त येत्या 8-10 दिवसांत न झाल्यास चोरीस गेलेल्या मोटारसायकलधारकांच्या न्याय हक्कासाठी मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. मग होणार्या परिणामास आपण व आपले पोलीस प्रशासन जबाबदार राहील या आशयाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरवडे यांना दिले आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे, शहर सरचिटणीस रोहित जोंजाळ, तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, कामगार सेनेचे नंदू भाऊ गंगावणे, विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत, विद्यार्थी सेना तालुका संघटक अतुल तारडे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव, लखन कडवे, ज्ञानेश्वर काळे, मृत्युंजय रुद्राक्ष, विद्यार्थी सेना शहर सरचिटणीस संकेत शेलार, उपशहर अध्यक्ष रतन वर्मा, प्रमोद शिंदे, विभागाध्यक्ष मारुती शिंदे, बजरंग शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.