शहरातील कचर्‍याचे मोजमाप मनपाच्या काट्यावर

शहरातील कचर्‍याचे मोजमाप मनपाच्या काट्यावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओला व सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. कचर्‍याच्या मोजमापासाठी सक्षम अधिकार्‍याची नेमणूक करावी, लवकरच महापालिकेचा वजन काटा बसविण्यात येणार असून 30 जून रोजी मनपाचा स्वतंत्र वजन काटा कार्यन्वित होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिली.

घुले यांनी बुरुडगाव येथील मनपाच्या कचरा डेपोला अचानक भेट दिली. याठिकाणचे विविध प्रश्न निदर्शनास आल्यानंतर घनकचरा विभागाची तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना घुले यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक सचिन जाधव, डॉ. धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, निखिल वारे, घनकचरा विभागाचे प्रमुख शंकर शेडाळे, के. के. देशमुख, पी. एस. बिडकर व स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

बुरुडगाव येथे कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. मोठमोठ्या यंत्रसामग्री बसविण्यात आल्या परंतु या मशीन चालवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्यामुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे, तसेच या ठिकाणी शेड नसल्यामुळे शहरातील संकलित केलेला कचरा भिजला जात असल्याने या कचर्‍यावर प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.

कचरर्‍या संदर्भातील दैनंदिन अहवाल सादर करण्यात यावा. तसेच मटन, चिकन दुकानदार वेस्टेज रस्त्यावर फेकून देतात त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आदी विषयांवर बैठकीत चार्चा होऊन निर्णय घेण्याचे आदेश घुले यांनी प्रशासनाला दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com