मानाच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

मानाच्या गणेश मंडळाच्या बैठकीत उपस्थिती । प्रतिष्ठीत धास्तावले
मानाच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मानाच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बैठकीला उपस्थित असणार्‍याचे धाबे दणाणले आहेत. आधल्या दिवशी बैठक अन् दुसर्‍या दिवशी आलेला पॉझिटिव्ह रिपोर्ट यामुळे प्रमुख मंडळाचे प्रतिष्ठित पदाधिकारी चिंतेत आहेत.

मानाच्या गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनावर निर्णय घेण्यासाठी मानाच्या गणेश मंडळाची बैठक रविवारी नगरात झाली. शहरातील प्रतिष्ठित अन् मानाच्या मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

एक वरिष्ठ पोलीस अधिकारीही या बैठकीला आले. त्यानंतर प्रमुखांनी एकत्रितपणे वरिष्ठांना साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे पत्र दिले. हे पत्र देताना जे उपस्थित होते, त्यातील एकाचा रिपोर्ट दुसर्‍या दिवशी (सोमवारी) पॉझिटिव्ह निघाला. महापालिका अन् शहरातील प्रतिष्ठीतांमध्ये गणना होणार्‍या सोबत या मंडळाच्या नेत्याची हजेरी आता धास्ती लावणारी ठरली आहे.

डॉक्टर सुध्दा बाधित

बुरूडगाव रोड परिसरात राहणारे डॉक्टर दाम्पत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय बोल्हेगाव फाटा परिसरातील एका डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बुरूडगाव परिसरातील रहिवासी असलेले डॉक्टर प्रथम पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com