15 तारेखपर्यंत शहरातील ‘या’ ठिकाणचा फळ व भाजीपाला विभाग बंद

15 तारेखपर्यंत शहरातील ‘या’ ठिकाणचा 
फळ व भाजीपाला विभाग बंद
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वाढत चाललेले संक्रमण रोखण्यासाठी नगर भाजीपाला फळ आडते असोसिएशनने शनिवार 15 मेपर्यंत फळ व भाजीपाला विभाग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते व सचिव मोहन गायकवाड यांनी दिली आहे.

शहरासह केडगाव उपनगरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. नागरिकांचा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना, करोनाचे संक्रमण अटोक्यात आनण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात 10 मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य सुविधा सोडूनफक्त दूध सकाळी सात ते अकरापर्यंत विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे. यात फळे व भाजीपाला विक्री परवानगी देण्यात आलेली नाही.

मात्र, उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये 15 मे पर्यंत सकाळी चार ते सातपर्यंत फळे व भाजीपाला व्यावसायिक दुकाने उपबाजार नेप्ती येथे सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. उपविभागीय अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या वेगवेगळ्या आदेशान्वये व्यापार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराचे आ. संग्राम जगताप व महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या कडक लॉकडाऊनच्या निर्णयाचे असोसिएशनच्यावतीने स्वागत करुन पाठिंबा देण्यात आला आहे. तर कोठी मार्केटयार्ड येथील फळे व भाजीपाला विभाग 15 मे पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com