शहर भाजपाचे ‘दार उघड उद्धवा’ आंदोलन

गुलमोहर रोड, मंगल गेटसह भिंगारमध्ये स्वतंत्रपणे घंटानाद
शहर भाजपाचे ‘दार उघड उद्धवा’ आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील मंदिरे सरकारने अजूनपर्यंत उघडली नाहीत. मंदिरे उघडावी यासाठी भाजपच्यावतीने शनिवारी दार उघड उद्धवा दार उघड,

हे आंदोलन करण्यात आले. नगर शहरासह भिंगारमधील मंदिरात शहर भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

सरकारने काही अडचण असल्यास अटी व शर्ती टाकून मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी. करोना संकटाच्या काळामध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून हजारो दिंड्यांच्या माध्यमातून लाखो भक्त पंढरपूरला पिढ्यानपिढ्या जात होती.

परंतु नागरिकांनी आपल्यावर आलेले संकट दूर लोटण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य केले आहे. तरी लवकरात लवकर मंदिरे खुली करावी, अशी मागणी मनपा सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी केली.

गुलमोहोर रोडवरील स्वामी समर्थ मंदिर, नवलेनगर येथील हनुमान मंदिर व तारकपूर रोडवरील झुलेलाल मंदिर येथे शंखनाथ, महाआरती व निदर्शने केली. यावेळी मल्हार गंधे, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, ऋषिकेश देशमुख, गौरव परदेशी आदी उपस्थित होते. नगर शहर मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी कारंजा याठिकाणी हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी नरेंद्र कुलकर्णी, मालनताई ढोणे, सुवेंद्र गांधी, अ‍ॅड. विवेक नाईक आदी उपस्थित होते. वसंत लोढा यांनी गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरा बाहेर घंटानाद आंदोलन केले. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन झालेल्या या आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते एल. जी. गायकवाड, मुकुंद वाळके, विलास नंदी, उमेश साठे, सागर शिंदे सहभागी झाले होते.

भाजप व्यापारी आघाडी नगर शहरच्यावतीने मंगलगेट येथे मारुती मंदिर समोर घंटा व थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले. एकीकडे मॉल व दारू दुकाने यांना परवानगी देऊन ती सुरू करण्यात आली आहेत. अर्थकारणाला चालना देण्यासाठी मंदिरे व धार्मिक स्थळे देखील उघडण्याची गरज असल्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, अनिल गट्टाणी, राजेंद्र गीते, श्याम जाखोटिया, अभिषेक दायमा, बद्री राठी, निकीत खटोड, योगेश जाजू, पारप्पा हरबा, रोहन गट्टाणी, अशोक खीचुसरा आदी सहभागी झाले होते. भिंगार येथेही भाजपच्यावतीने वसंत राठोड यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.

भिंगारमधील मारुती मंदिर, चौंडेश्वरी मंदिर, राम मंदिर, गणपती मंदिरासमोर एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी दार उघड उध्दवा दार उघड अशा घोषणा दिल्या. यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दहिहंडे, गणेश साठे, दामूशेठ माखिजा, नगरसेविका शुभांगी साठे, वैशाली कटोरे, ज्योत्स्ना मुंगी, शहर सरचिटणीस महेश नामदे, संतोष हजारे, अंबादास घडसिंग, किशोर कटोरे, अनंत रासने, मनेष नन्नवरे आदी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com