शहर, उपनगरासह तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

शहर, उपनगरासह तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर (City), उपनगरासह नगर ग्रामीण भागातून दररोज तीन ते चार दुचाकी चोरीला (Bike theft) जात आहेत. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून (Police) याचा कुठलाच तपास केला जात नाही. दुचाकी चोरणार्‍या ठराविक टोळ्या सक्रीय असून पोलिसांकडून अशा टोळ्या उघड करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे. चार दुचाकीं चोरीला गेल्याच्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

नगर शहरातील अरुणोदय हॉस्पिटलच्या समोरून विनायक सदाशिव गाढे (रा. तनपुरे मळा, राहुरी) यांची दुचाकी (एमएच 17 झेड 9065) चोरीला गेली. याप्रकरणी गाढे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गाढे यांनी हॉस्पिटलसमोर हॅण्डल लॉक करून दुचाकी उभी केली होती. लॉक तोडून दुचाकी लंपास केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी पहाटे केडगाव (Kedgav) येथील मनोज भाऊसाहेब नांगळ यांची दुचाकी (एमएच 17 यु 8488) चोरीला गेली. त्यांनी कोतवालीत फिर्याद दिली आहे.

नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातून संजय आप्पासाहेब धामणे यांची दुचाकी दोघांनी चोरून नेली. त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकृष्ण रामकृष्ण वानखडे, सचिन वानखडे (रा. भुगाव जि. अमरावती) यांच्याविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील कामरगाव (Kamargav) शिवारातून अंकुश आनंदा ठोकळ यांची दुचाकी (एमएच 16 झेड 4807) चोरीला (theft) गेली. त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वारंवार होणार्‍या दुचाकी चोरीच्या (Bike theft) घटना रोखण्यात पोलिसांना अपयश (Failure to police) आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com