नागरिकांनी करोना चाचणी करून घ्यावी : डॉ. गायकवाड

नागरिकांनी करोना चाचणी करून घ्यावी : डॉ. गायकवाड

पुणतांबा (वार्ताहर) - पुणतांबा गावातील नागरिकांनी आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. कुंदन गायकवाड यांनी केले.

देशासह राज्यात करोनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. आरोग्य सेवा घेताना अनेक अडचणी येत असून पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात परिसरातील अनेक गावातून नागरिक मोठ्या संख्येने येऊन करोना चाचणी करून घेत आहे.

या तुलनेत गावातील नागरिक करोना चाचणी करून घेण्याकरिता येत नाही. नागरिकानीं निसंकोचपणे करोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन करून आतापर्यंत लसीकरण करून घेतलेल्या नागरिकांची संख्या 1678 झाली आहे, असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com