21 कोटींची वसुली, आणखी जोर लावा

महापौर : नागरिकांच्या सोयीसाठी लोकअदालत
21 कोटींची वसुली, आणखी जोर लावा

अहमदनगर | प्रतिनिधी

ऑगस्ट 2021 अखेर 21 कोटी वसुली झाली. सध्या वसुली मंदावली आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त घरपट्टी वसुलीबाबत कार्यवाही करावी. गेल्या महिन्यामध्ये लोक अदालतीद्वारे (Lokadalat) मालमत्ताधारकांना दिलासा देण्यात आला. याच धर्तीवर 25 सप्टेंबर 2021 रोजी घरपट्टी संदर्भात लोक अदालत घेण्यात येणार आहे. त्यामध्ये थकबाकीदारांना 75 टक्के शास्तीमाफी मिळेल, असे महापौर सौ.रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी सांगीतले.

21 कोटींची वसुली, आणखी जोर लावा
पुलावरून पाणी जात असतांना ट्रक नेण्याचा केला प्रयत्न आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO

मनपा (AMC) हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसंदर्भात महापौर शेंडगे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, सचिन शिंदे, अतिरिक्त आयुक्त प्रदिप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, श्रीनिवास कुरे, सहाय्यक आयुक्तसंतोष लांडगे, श्री.सचिन राऊत, दिनेश सिनारे, प्रभाग अधिकारी श्री.सोनवणे, श्री.गोसावी, सुखदेव गुंड, सुनिल चाफे, राजेश लयचेट्टी, राजू नराल आदी उपस्थित होते.

महापौर शेंडगे म्हणाल्या, सद्यस्थितीत वसुली कमी प्रमाणात होत आहे असे निदर्शनास आले आहे. अनेक नागरिक घरपट्टी भरण्यास तयार असतात. त्यांच्याकडे वसुली लिपीक जात नाही. वसुली लिपीक प्रभागामध्ये फिरून मालमत्ताधारकांना घरपट्टी भरणेबाबत प्रोत्साहित केल्यास मालमत्ताधारक घरपट्टी भरतील. नागरिकांच्या घरपट्टी संदर्भात असलेल्या अडचणी सोडविणे वसुली लिपीक यांनी कार्यवाही करावी. त्यामुळे देखील भरणा वाढण्यास मदत होईल. नागरिकांनी लोक अदालतीत भाग घेण्यासाठी संबंधीत प्रभाग अधिकार्‍यांशी संपर्क साधून अर्ज सादर करावे. उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, घरपट्टी नागरिक भरण्यास तयार असतात त्यांच्यासाठी ज्या काही योजनेद्वारे सवलत दिली जाते त्याची माहिती नागरिकांना नसते. लोकअदालतमध्ये घरपट्टी भरण्या संदर्भात सवलत देत असल्याबाबत नागरिकांना कळवा.

21 कोटींची वसुली, आणखी जोर लावा
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

25 सप्टेबर 2021 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांनी लोक अदालतमध्ये अर्ज दाखल करावे व घरपट्टी भरून मनपास सहकार्य करावे. अनाधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्याची मोहिम सुरू आहे. या योजनेची मुदत संपल्यानंतर संबंधीतांवर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com