3 लाख 19 हजार नागरिकांना पहिला डोस पूर्ण

3 लाख 19 हजार नागरिकांना पहिला डोस पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 3 लाख 19 हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यासाठी आणखी 17 हजार करोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले. आतापर्यंत जिल्ह्याला एकूण 4 लाख 10 हजार 940 डोस प्राप्त झाले आहेत.

जानेवारी महिन्यांत करोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर आरोग्य, महसूल, पोलीस, पंचायत राज, गृह व शहरी कामकाज, रेल्वे सुरक्षा बल, तसेच 45 वर्षांवरील एकूण 3 लाख 75 हजार 868 लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 19 हजार 92 लोकांना पहिला, तर 40 हजार 582 लोकांना दुसरा असे एकूण 3 लाख 59 हजार 624 डोस देण्यात आले आहेत. मागील आठवड्यात शनिवारी आणखी 17 हजार करोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले.

आतापर्यंत जिल्ह्याला 4 लाख 10 हजार 940 डोस प्राप्त झाले आहेत. त्यात 3 लाख 36 हजार 900 डोस कोविशिल्ड, तर 73 हजार 980 कोव्हॅक्सिन डोसचा समावेश आहे. यातील 24 हजार 870 डोस लष्कराला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण 165 लसीकरण केंद्रांवर दररोज डोस दिले जात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com