नाताळ प्रेम, सद्भावना आणि बंधुत्वाचे प्रतीक

जॉन प्रभाकर : करोनामुक्तीसाठी ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना
नाताळ प्रेम, सद्भावना आणि बंधुत्वाचे प्रतीक

अहमदनगर (प्रतिनिधी)

भगवान येशु ख्रिस्त यांनी एक महान व्यक्तिमत्त्वाचा आदर्श जगासमोर ठेवला नाताळ या सणाचे विशेष महत्त्व असून या दिवशी एकमेकांमधील प्रेम, सद्भावना आणि बंधुत्वता या सर्व गोष्टीचे प्रतीक म्हणून नाताळ सण साजरा केला जातो, ख्रिश्चन समाजामध्ये या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले असे प्रतिपादन रेव्ह. जॉन प्रभाकर यांनी व्यक्त केले.

नाताळ निमित्त अहमदनगर पहिली मंडळी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांना संदेश देताना रेव्ह. जॉन प्रभाकर बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. ते म्हणाले, भगवान येशू ख्रिस्ताने आपले संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी अर्पण केले. लोकांना बरोबर घेऊन योग्य मार्गावर जाण्याचा संदेश देत गेले. समाजामध्ये त्यांची देव म्हणून ओळख निर्माण झाली. जीवन जगत असताना भगवान येशूनी अनेक नागरिकांना कष्टातून मुक्ती दिली. त्यांनी स्वतःचे जीवन दुसर्‍याच्या भल्यासाठी खर्च केले.

जगभरात आज नाताळ सन साजरा होत आहे. यशुच्या जन्मोत्सव निमित्त चर्च मध्ये प्रार्थना आणि शुभेच्छा गीतांनी एकमेकांना संदेश देणारे ख्रिस्त बांधव हा सन मोठ्या उत्साहात साजरा करतात. अहमदनगर येथे देखील हजारो ख्रिस्त बांधवांनी अहमदनगर पहिली मंडळी चर्च मध्ये प्रार्थना करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.आज येशु ख्रिस्तचा जन्मोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांनी चर्च मध्ये गर्दी केली. चर्च मध्ये करण्यात आलेली सजावट आलेल्या भक्तगणांचे आकर्षण ठरले. येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन मोठ्या उत्साहात नाताळ हा सण साजरा करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com