अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाताळनिमित्त नगर शहरातील विविध चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी प्रकाश किरणांनी चर्चा उजाळून निघाली आहेत.

दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चामधील गुरुवारी रात्रीचे काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तारकपूर भागातील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चला 137 वर्ष पूर्ण झाली असल्याने तसेच ख्रिस्तजयंतीनिमित्त या चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने परिसर उजळून निघालेला आहे.

कोरोनाच्या धर्तीवर शासनाच्या नियमांचे पालन करुन सर्व धार्मिक कार्यक्रम होत असले तरी यंदाच्या वर्षी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम तसेच कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत.

तारकपुर येथील सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चला 137 वर्ष पूर्ण झाले आहे. 1883 साली या चर्चेची स्थापना करण्यात आली. इंग्रज मिशनरी यांनी त्याची स्थापना केली आहे. या चर्चची वैशिष्टे असे आहेत की, 25 डिसेंबर ख्रिस्त जयंती व नवीन वर्ष निमित्ताने या ठिकाणी विद्युत रोषणाईने परिसर उजाळून निघाला आहे. शुक्रवारी (दि.25) सायंकाळी साडेसहा वाजता येथे प्रार्थना होणार आहे.

समाज बांधवानी शुक्रवारी चर्चमध्ये यावे असे आवाहन प्रीस्ट इन चार्ज रेव्ह. डी डी सोनावणे व सचिव प्रशांत पगारे यांनी केले आहे. चर्चमध्ये येताना मास्कचा वापर करावा, तसेच आतमध्ये प्रवेश करताना सॉनिटायझरचा वापर करावा तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोपालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.