चितळे रोडवर भुयारी गटार कामामुळे वाहतूक कोंडी

चितळे रोडवर भुयारी गटार कामामुळे वाहतूक कोंडी

व्यापार्‍यांची दुकाने बंद, नागरिकांना त्रास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील चौपाटी कारंजा (Chowpati Karanja) येथील रस्ता आठ दिवसांपासून खोदण्यात आला असून, त्यामुळे चितळे रोड (Chitale Road) वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे येथील व्यापार्‍यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहे. जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या कामामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीबरोबर (Traffic jams) स्थानिक व्यापार्‍यांचे नुकसान होऊ नये असे नियोजन करण्याची मागणी होत आहे.

चितळे रोडवर (Chitale Road) आठ दिवसांपासून काम सुरू असून, त्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic jams) होत आहे. विशेष म्हणजे, या काम चौकात सुरू आहे. वाहतूक वळवली नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. चितळे रोड हा शहराच्या मध्यवर्ती आहे. त्यामुळे महापालिका (Municipal Corporation) व शहर वाहतूक प्रशासनाने (City Transportation Administration) या कामाचे नियोजन करण्याची गरज स्थानिक व्यापार्‍यांनी व्यक्त केली. दिल्ली दरवाजा, जुने कोर्टाकडून आणि चितळे रोडवरील (Chitale Road) वाहनांची संख्या अधिक आहे. चितळे रोडवर काम सुरू असल्याची अनेकांना माहिती नाही. त्यामुळे वाहने कामाच्या दिशेने येतात आणि वाहतूक कोंडी होते, असे स्थानिक व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

या कामामुळे आणि त्यातून होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक व्यापार्‍यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे होत असलेल्या कामाला गती देऊन काम लवकरात लवकर उभारावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com