डॉ. निघुते यांची गळफास घेऊन आत्महत्या

डॉ. निघुते यांची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील नवीन नगर रस्त्यावरील चिरायू हॉस्पिटल (Chirayu Hospital) मधील डॉ. पुनम योगेश निघुते (Dr. Poonam Yogesh Nighute) (वय 35) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ताजणे मळा परिसरात घडली. शहरातील ताजणे मळा परिसरात डॉक्टर पुनम निघुते (Doctor Poonam Nighute) राहत होत्या.

पती-पत्नी दोघेही डॉक्टर (Doctor) असून ते चिरायू नावाचे हॉस्पिटल (Chirayu Hospital) चालवतात. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डॉ. पुनम (Dr. Poonam) यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.दत्तात्रय गुलाबराव जोंधळे यांनी शहर पोलिसांना या घटनेची खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. शेख करत आहे. डॉक्टर पुनम निघुते यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com