चीनी आजारामुळे नगर सतर्क

चीनी आजारामुळे नगर सतर्क

लहान मुलांमध्ये श्वसनविकार वाढण्याचा धोका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चीनमध्ये लहान मुलांना होणार्‍या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार आणि जिल्हा पातळीवरील आरोग्य विभागाला खबरदारीच्या सुचना आहेत. त्यानूसार जिल्हा पातळीवरून आता आरोग्य विभाग लहान मुलांना होणार्‍या श्वसनविकारावर (सारी) लक्ष ठेवून आहेत.

देशात आणि राज्यात करोना महामारीसारखी परिस्थिती उद्भवू नये, त्यासाठी सरकारने आधीच तयारी सुरु केली आहे. करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं चीनमधल्या लहान मुलांच्या श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील आरोग्य विभाग सक्रीय झाले आहे.

राज्यातील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्वतयारी आवश्यक मनुष्यबळ, प्रयोगशाळाची तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश देण्यात आले आहे. चीनमधील लहान मुलांमध्ये न्युमोनिया होण्याचे कारण प्रामुख्याने इन्फ्युएन्झा, मायकोप्लाझा आणि सार्स कोविड-19 असल्याचे निरीक्षणात समोर आले आहे. देशाला आणि राज्याला देखील धोका जरी नसला तरी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांनी सारीबाबतची माहिती घेवून नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड खाटांची तयारी, ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयारी, ऑक्सिजन प्लांट, सिलेंडर कार्यान्वित आहेत की नाही याची खातरजमा करण्याचे आदेश दिला आहे.

चीनमध्ये लहान मुलांमध्ये बळावलेल्या श्वसनविकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून सुचना आल्या आहेत. आरोग्य उपसंचालकांनी सारीबाबत (लहान मुलांमध्ये आढळणारा श्वसनविकार) दक्षतेच्या सुचना आहेत. त्यानूसार कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या सारीचे रुग्ण आढळलेले नाहीत. मात्र, काळजी घेण्यात येत आहे.

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com