
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील चिलवडी येथील गावठी भट्टीवर कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि.6) सायंकाळी 4 वाजता केलेल्या कारवाईत दारू तयार होत असलेले 1 हजार 200 लिटर रसायन पोलिसांनी नष्ट केले. याप्रकरणी नितीन भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सतिश गावित, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, हवलदार मारुती काळे, पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खरात, अर्जुन पोकळे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.