डोळ्यात मिरचीपुड फेकून साडेतीन लाख लांबविले

सावेडी उपनगरातील घटना : दोघांविरूध्द गुन्हा
Crime news
Crime news

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डोळ्यात मिरचीपुड फेकून साडेतीन लाख रूपये असलेली बॅग लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री सावेडी उपनगरातील भगवान बाबा चौकात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शामराव हरीभाऊ नागवडे (वय 55 रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

शामराव हे एमआयडीसीतील हिंदुस्तान एजन्सीमध्ये सेल्समन म्हणून नोकरीला आहे. नगर शहरातील दालमंडई भागातील किरकोळ विक्रेत्यांना हिंदुस्तान एजन्सीमार्फत माल पुरविणे व बीलाचे पैसे गोळा करण्याचे काम ते करतात. जमा झालेली रक्कम रात्रीच्यावेळी ते स्वत:कडे ठेवतात व दुसर्‍या दिवशी सकाळी कार्यालयात जमा करतात. मंगळवारी शामराव यांनी दालमंडईतील दुकानदारांकडून साडेतीन लाख रूपये रक्कम जमा केली होती. शामराव ती रक्कम बॅगमध्ये घेवून रात्री दुचाकीवरून घराकडे जात असताना भगवान बाबा चौकात साडेदहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभा असलेल्या एकाने शामराव यांना शिवीगाळ केले.

डाव्या साईटने तोंडावर मिरचीपुड फेकली व झटापट करून शामराव यांच्याकडील पैशाची बॅग घेवून तो व्यक्ती पळून गेला. दरम्यान त्याठिकाणी आणखी एक जण दुचाकीवर आलेला होता. तो देखील त्यावेळी पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक निरीक्षक जे.सी. मुजावर, सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com