महावितरणचा चिलेखनवाडी ग्रामपंचायतीला झटका

दोन दिवसांत 20 लाख रुपये वीजबिल थकबाकी भरण्याची नोटीस
महावितरणचा चिलेखनवाडी ग्रामपंचायतीला झटका

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील चिलेखनवाडी ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्राकडील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कुलूप ठोकले मात्र महावितरणने चिलेखनवाडी ग्रामपंचायतीला थकीत विजबिलापोटी 20 लाख 37 हजार 26 रुपये 34 पैसे एवढी रक्कम भरण्याची नोटीस देऊन ग्रामपंचायतीला चांगलाच झटका दिला.

चिलेखनवाडी ग्रामपंचायतीने दि.7 ऑक्टोबर रोजी वीज उपकेंद्राला 4 लाख 77 हजार 811.47 रुपये थकीत मालमत्ता कर सात दिवसांच्या आत न भरल्यास उपकेंद्राला कुलूप लावण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार सात दिवसांत सदर रक्कम न भरल्याने ग्रामपंचायतीने दि.11 ऑक्टोबर रोजी कुलूप लावले होते.मात्र वीज वितरण कंपनीने 21 दिवसांत अदा केला जाईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीस दिल्यानंतर त्याच सायंकाळी 6 वाजता उपकेंद्राचे कुलूप काढण्यात आले.

मात्र विजवीतरण कंपनीने सुद्धा थकीत वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. त्या नोटिशीत वीज कंपनीने म्हटले की, आपणाकडे महावितरण कंपनीची रक्कम रु.20 लाख 37 हजार 26 रुपये 34 पैसे एवढी थकबाकी आहे. सदरहु थकबाकीची रक्कम व थकबाकी रक्कमेवरील व्याज आपणाकडून येणे आहे.

एखाद्या प्रकरणात वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या जागेवर महावितरण कंपनीची दिशाभूल करून वीज पुरवठा घेण्यात आला असल्याचे अथवा अप्रामाणिक हेतूने अनधिकृतपणे वीज वापर (वीज चोरी) होत असल्याचे आढळून आल्यास त्याची महावितरण कंपनीकडून योग्य ती पडताळणी करून भारतीय विद्युत कायदा 2003 प्रमाणे फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येते याची कृपया नोंद घ्यावी. तरी सदरची नोटीस मिळाल्यापासून 2 दिवसांचे आत आपली थकबाकी संबंधित उपविभागीय कार्यालयात भरणा करावी, अन्यथा आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल.

Related Stories

No stories found.