मुले अपहरण बनाव प्रकरणी गुन्हा

अपहरणकर्त्यांनी सोडल्यानंतर कुटुंबियांनीच लपवली मुले
मुले अपहरण बनाव प्रकरणी गुन्हा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

सावकारकीच्या प्रकारातून ट्रॅक्टरसह दोन मुलांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र अपहरण करणारांनी मुलांना सोडल्यानंतरही त्यांना कुटुंबियांनीच लपवून ठेवत बनाव केल्या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील बाळासाहेब जोगोजी व्हटकर यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार मुलगा अमोल व्हटकर व पाटेवाडी गावातील महेश दादा झेडगे यांचे संशयित बापू मुरलीधर आजबे (रा. शिराळ ता.आष्टी) व सचिन सुभाष शेटे, महेंद्र कंबळकर (दोघेही रा.माहीजळगाव ता.कर्जत) यांनी सात लाख रुपयांसाठी ट्रक्टरसह दोघांचे अपहरण केले होते.

तक्रार दाखल होताच संशयितांनी दोन्ही मुलांना पुन्हा आणून सोडले होते. मात्र फिर्यादीच्या पुतण्यानेच मुलांना लपवून ठेवले होते. तर तक्रारदार व्हटकर व त्यांच्या पत्नी पोलिसांवर दबाव आणत होते.अखेर पोलिसांनी शोध घेऊन फिर्यादीचा पुतण्या भाऊसाहेब व्हटकर याला बुधवारी (दि.24 रोजी) अटक केली. त्याने मुलांना लपवून ठेवल्याची कबुली दिली. तसेच मुलांना हजर केले. अपहरणाचा बनाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com