दहा वर्षांच्या मुलाची आत्महत्या

नागापूर उपनगरातील घटना
दहा वर्षांच्या मुलाची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

10 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सर्वेश सचिन साळफळ (वय 10) असे मृत मुलाचे नाव आहे. शहरातील नागापूर उपनगरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सर्वेश याने बुधवारी घरात गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली. दरम्यान सर्वेश याचे वय अवघे 10 वर्षे आहे. त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com