राहुरीत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी गजाआड

पालकांनी केली यथेच्छ धुलाई
राहुरीत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी गजाआड

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील (Rahuri) एक लिंगपिसाट तरूण गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार (Child Sexual Abuse) करत असल्याचा प्रकार दि. 7 जून रोजी उघडकीस आला. लिंग पिसाट तरूणाची (Youth) त्या लहान मुलांच्या पालकांनी यथेच्छ धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

राहुरी शहरातील (Rahuri) उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोकुल कॉलनी येथे अभय ऊर्फ राज रामचंद्र तनपुरे हा त्याच्या वडिलांसोबत राहतो. तो लहान मुलांना अश्लील व्हिडीओ (Pornographic Videos) दाखविण्याचे आमिष (Lure) दाखवून त्यांचे लैंगिक शोषण (Child Sexual Abuse) करीत होता. हा प्रकार हा गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू असल्याची चर्चा आहे. हा प्रकार त्या मुलांच्या पालकांना काही महिन्यापूर्वी समजला. तेव्हापासून ते अभय तनपुरे या तरूणाच्या पाळतीवर होते.

दि. 3 जून रोजी दुपारी अभय तनपुरे याने एका दहावर्षीय बालकाला त्याच्या घरात बोलावून घेतले. त्याला मोबाईलवर व्हिडीओ दाखविण्याचे आमिष दाखवून त्याला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्याला मारण्याची धमकी दिली. न्यायालय व पोलीस ठाण्याचे हेलपाटे नको म्हणून पीडीत बालकांच्या पालकांनी फिर्याद देण्याचे टाळले. मात्र, सरकार तर्फे पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे यांनी फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अभय ऊर्फ राज रामचंद्र तनपुरे रा. गोकुळ कॉलनी याच्याविरुध्द गुन्हा रजि. नं. 473/2022 भा.दं.वि. कलम 377, 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. घटनेनंतर आरोपी अभय तनपुरे याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com