नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

तालुक्यातील सलाबतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याबद्दल खाजगी चाईल्ड लाईनच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबद नगर येथील खाजगी चाईल्ड लाईनचे कर्मचारी प्रवीण शाम कदम (वय 27 वर्षे) रा.एकनाथनगर,केडगाव ता नगर याने नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी चाईल्ड लाईन इंडिया फाउंडेशन व स्नेहालय अंतर्गत काम करीत आहे.

माझ्या सोबत माझे सहकारी पूजा पोपळघट, महेश सूर्यवंशी, शाहिद शेख, अलिम पठाण, अब्दुल खान, राहुल कांबळे, शुभांगी माने व राहुल वैराळ असे एकत्रीत काम करतो. शून्य ते 18 वर्षे वयाचे बालकांसाठी काळजी व संरक्षणाचे अहोरात्र काम करत आहोत.

दि.2 डिसेंबर 2020 रोजी अज्ञात व्यक्तीने चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून कळविले की,सलाबतपूर येथील एका 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह

दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी तिचे रहाते घरी लावून देण्यात आला आहे.आम्ही माहिती घेतली असता बालविवाह झाल्याचे सखोल पुरावे आम्हाला मिळालेले आहेत.या मुलीचे 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच तिचे आई व वडील यांनी तिचा बालविवाह नवरदेव मुलगा दिनेश गंगाधर तेलुरे रा. शेवगाव याच्याशी लावून दिला. नवरदेव व त्याचे वडील गंगाधर वामन तेलुरे,आई तारामती गंगाधर तेलुरे यांना मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतांना देखील हा बालविवाह लावण्यात आला आहे.

तसेच सदर प्रकाराबाबत आम्ही सलाबतपूर गावातील ग्रामसेवक श्री भाऊसाहेब शेळके यांना वेळोवेळी समक्ष भेटून व फोनवरून सदर अल्पवयीन मुलीचे जन्माचे कागदापत्रा बाबद पाठपुरावा करणे बाबत लेखी कळवले आहे व सदर बालीकेस बालकल्याण समती समोर सादर करणेसाठी कळविले आहे.

तसेच सदर प्रकारातीत अल्पवयीन बालिका हीचे विवाह संदर्भातील 3 फोटो झेरॉक्स सादर केले आहे. तसेच बालिकेचे मुळ आधारकार्ड जमा केले आहे व पूर्ण चौकशी अंती आमची खात्री झाली की बालीकेचे वय 16 वर्षे 16 दिवस असे असून ती अल्पवयीन आहे व तीचा वरील इसम यांनी बालविवाह करून दिला असल्याने आमची इसम नाने 1) मुलीचे वडील, 2) मुलीची आई रा.सलाबतपूर ता.नेवासा 3)दिनेश गंगाधर तेलूरे 4) गंगाधर वामन तेजुरे तारामती गंगाधर तेलूरे रा.शेवगाव,जि अनगर यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार आहे.

या फिर्यादी वरून वरील पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतींबधक अधिनियम 2007चे कलम 9 व 11 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.