वीज पडून मुलाचा मृत्यू

दहेगाव बोलका येथील घटना
वीज पडून मुलाचा मृत्यू

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे हर्षद गणेश काळे (वय ११) याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील दहेगाव बोलका परिसरात वाटर सप्लाय जवळ गट नंबर २७८ येथे हर्षद गणेश काळे (वय ११) वर्ष हा आपल्या वडिलांबरोबर शेतात गेला असता दुपारी अचानक पाऊस सुरू झाला यावेळी हर्षद हा शेताच्या बांधावर उभा असताना अचानक अंगावर वीज अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला आहे.

त्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलवण्यात आले मात्र त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यास सांगितल्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याला डॉक्टरांनी तपासले व तो मृत असल्याचे सांगितले या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.