बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना अंगणवाडी कर्मचार्‍यांनी कोंडले दालनात

काय आहे प्रकरण वाचा
बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना अंगणवाडी कर्मचार्‍यांनी कोंडले दालनात

अकोले |प्रतिनिधी| Akole

बाल विकास प्रकल्पधिकारी एच एम हाके हे कार्यकर्त्यांच्या अंगावर धावल्याने अंगणवाडी कर्मचारी यांनी जोरदार घोषणाबाजी करत पंचायत समितीमध्ये घुसले व त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पंचायत समितीतील त्यांच्या दालनात  कोंडले.

यावेळी पंचायत समितीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. दरम्यान बाल विकास प्रकल्पअधिकारी हाके यांनी आपणही कामगाराचा मुलगा आहे, आमच्या कुटुंबापर्यंत कुणी जाऊ नये, जर आमचे कडून काही चुकले असेल तर मी  आंदोलन कर्त्यांची माफी मागतो असे म्हणत वादावर पडदा टाकला. यानंतर शांततेच्या मार्गाने अधिकाऱ्यांशी माकप व आंदोलनाचे नेते डॉ अजित नवले व सहकार्यानी चर्चा केली. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी सचिन कोष्टी हेही उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com