'यशवंत सामाजिक प्रतिष्ठान'ला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

'यशवंत सामाजिक प्रतिष्ठान'ला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

नेवासा (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाचा सेवाभावी संस्थेसाठीचा नाशिक विभागतील प्रथम क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी सन १९८८ पासून वर नमूद केलेल्या शासन निर्णयाद्वारे दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागतर्फे महाराष्ट्र राज्य छ.शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

नगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी खा. यशवंतरावजी गडाख व माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांतभाऊ गडाख यांचे नेतृत्वाखाली मोरयाचिंचोरे व परिसरात जलसंधारण व वनराईचे काम सुरू आहे.त्या कामाचे या पुरस्काराने खऱ्या अर्थाने चीज झाले. ५० हजार रुपये रोख,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com