छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचे मोठे कार्य केले

रामगिरी महाराज || पोहेगावात शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचे मोठे कार्य केले

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतार घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे भगवंताचे शिवाचेच अवतार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यास देखील हिम्मत लागते. पोहेगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीने बसवून आदर्श घडवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी मोठे कार्य केले आहे ,असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे राजे छत्रपती स्मारक समितीच्यावतीने बसवण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते. यावेळी स्मारक समितीचे मार्गदर्शक नितिनराव औताडे, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शारदानंदगिरी महाराज, सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, डाऊचचे सरपंच संजय गुरसळ, अभिषेक आव्हाड, राजेंद्र औताडे, संचालक डी. पी. औताडे, अशोकराव नवले, गोरक्षनाथ औताडे, एम. टी. रोहमारे, साईनाथ रोहमारे, निवृत्ती औताडे,कचेश्वर डुबे, निवृत्ती शिंदे, दादासाहेब औताडे, रमेश झांबरे, आप्पासाहेब औताडे, अशोकराव औताडे, नानासाहेब औताडे, मधुकर औताडे, राजेंद्र कोल्हे, रमेश औताडे, रावसाहेब औताडे, साहेबराव गोरे, सुदाम मोरे, मधुकर पोटे, दिनकर औताडे, अर्जुन पवार, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र मोराडे, चांगदेव कांदळकर, रघुनाथ देवडे, गजानन वाघ, प्रकाश औताडे, प्रकाश रोहमारे, निवृत्ती जोंधळे, शंकर वाघ, किशोर वाघ, श्रीहरी घोटेकर, बाबुराव वाघ, नवनाथ पवार, चंद्रकांत औताडे, कारभारी रोहमारे, चांगदेव कांदळकर आदींसह राजे छत्रपती स्मारक समितीचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत हा अनावरण सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन महंत रामगिरी महाराजांनी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगितली. नितीनराव औताडे यांच्या हस्ते रामगिरी महाराजांचे संतपूजन करण्यात आले. आभार सरपंच अमोल औताडे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com