छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जागेचे सुशोभीकरण करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जागेचे सुशोभीकरण करा

अन्यथा 15 दिवसांनी गेट बंद आंदोलन - सभापती वाकळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा (Statue) महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) आवारामध्ये बसविण्याबाबतची निविदा प्रक्रीया होऊन कार्यारंभ आदेश (Order) देण्यात आला आहे. दरम्यान ज्या ठिकाणी पुतळा बसवायचा आहे, त्या ठिकाणी सुशोभीकरणाची (Beautification) प्रक्रिया करण्यात आली नसून येत्या 15 दिवसांमध्ये सुशोभीकरणाची (Beautification) प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा मनपाचे गेट बंद आंदोलन करू, असा इशारा मनपा स्थायी समिती सभापती कुमार वाकळे (Standing Committee Speaker Kumar Wakale) यांनी मनपा आयुक्त शंंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore) यांना दिला आहे.

मनपा आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा (Statue) बसविण्यात येणार आहे. परंतु मनपाच्या आवारामध्ये ज्या ठिकाणी पुतळा बसवायचा आहे, त्या ठिकाणी पुतळ्याचा बेस तयार करून इमारतीचे सुशोभिकरण करणे, बॅगराउंड तयार करणे, चौथरा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या शासकिय परवानगीची आवश्यकता नसताना तसेच सदचा विषय हा मनपाच्या स्तरावरील असूनसुध्दा तसेच 18 एप्रिल, 2022 रोजीच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये या बाबत सुचना दिल्या आहेत.

वेळोवेळी महानगरपालिकेचे शहर अभियांता यांचेशी चर्चा केलीली असतांना अद्याप पर्यंत या विषयाबाबत निविदा प्रक्रीया झालेली दिसुन येत नाही. 15 दिवसात सुशोभीकरणाची प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गजेंद्र भांडवलकर, राम काते, राहुल गाडेकर, राजू तोडमल, गौरव परदेसी, प्रवीण अकोलकर, निखिल गहीले, भाऊ पुंड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.