
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे रयतेचे राजे होते. संपूर्ण जगाला आदर्श राजा म्हणून हेवा वाटावा, असे विलक्षण व्यक्तीमत्व होते; हे महाराष्ट्रातील मराठी जनतेचे भाग्य म्हणावे लागेल. शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटना या आदर्शवत, थरारक, अंगावर काटा आणणार्या आहेत. शत्रूवर आपल्या तलवार आणि मावळ्यांच्या साहयाने मात करत असत असा हा रयतेचा राजा सर्वांच्या हृदयात कायम राहिल, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी केले.
नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, सभापती पुष्पा बोरुडे, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, दत्ता जाधव, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, दिपक खैरे, गौरव ढोणे, रमेश खेडकर, लता पठारे, विशाल गायकवाड, रवि जाधव, विकास सपाटे, राम डमाळे, अंबदास शिंदे, मंगेश शिंदे, विकी हिरणवाळे आदी उपस्थित होते.