बहुजनांच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न - छत्रपती संभाजीराजे

बहुजनांच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न - छत्रपती संभाजीराजे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा आरक्षणासाठी जेव्हा नाशिकमध्ये मूक आंदोलन झाले होते, तेव्हा मंत्री छगन भुजबळ तेथे आले होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे मत व्यक्त केले होते. बहुजनांना एकत्र करण्याचा विचार शाहू महाराजांनी दिला आहे. 6 मे रोजी शाहू महारांजाची स्मृति शताब्दी आहे. त्यासंबंधी मी मंत्री भुजबळ यांची भेट घेतली असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक नुतनीकरण लोकार्पण कार्यक्रमानिमित्त खा. छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सोमवारी नाशिकमध्ये ओबीसींचे नेते मंत्री भुजबळ यांची भेट घेतली.

Related Stories

No stories found.