उच्चशिक्षीत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणार : संभाजीराजे

पीएचडीसाठी गाईड मिळवून देण्याचे ‘स्मायलिंग अस्मिता’कडून साकडे
उच्चशिक्षीत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणार : संभाजीराजे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. विद्यार्थ्यांना कदापि वार्‍यावर सोडणार नाही, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले.

बीडकडे जात असताना छत्रपती खा. संभाजीराजेंनी नगरमध्ये स्मायलिंग अस्मिताच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक अभिजित दरेकर, विनीत गाडे पाटील, यशवंत तोडमल, ऋतिक काळे, संभाजी कदम, अक्षय शेळके, सचिन गायगोवे आदींनी उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. मराठवाडा विद्यापीठात मराठा विद्यार्थ्यांना टाळले जात आहे. पीएचडीसाठी गाईड मिळाले नाही तर ते पीएचडी होऊ शकणार नाही.

त्यासाठी सरकारवर दबाव टाकावा, अशी विनंती तोडमल यांनी केली. गाईड न मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्राध्यापक होता येणार नाही, असे अभिजीत दरेकर म्हणाले. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आठवडाभरात या संदर्भात सरकारशी चर्चा करून विषय मार्गी लावले जातील. विद्यार्थ्यांनी नैराश्यग्रस्त होऊ नये, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजेंनी दिले. यावेळी सकल मराठा समाजाच्या अ‍ॅड. अनुराधा येवले, नगरसेवक योगीराज गाडे, रिनुल नागवडे, शुभम पांडुळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com