केंद्रीय कृषी बिल रद्द करा, छात्रभारतीकडून संगमनेरात निदर्शने

केंद्रीय कृषी बिल रद्द करा, छात्रभारतीकडून संगमनेरात निदर्शने

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

केंद्रिय कृषी बिल रद्द करा या मागणीसाठी छात्रभारती संघटनेकडून संगमनेर बस स्थानक व प्रांतकार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करावेत या मागणीसाठी पंजाब व हरियाणा येथील शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला छात्रभारतीने पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उद्ध्वस्त करणारे कृषी विधेयक संसदेमध्ये तीन शेतकरी विरोधी बिल मंजूर करून इथल्या शेतकर्‍यांवर मोठा अन्याय केलेला आहे,

हे तिन्ही बिल भांडलवदार यांच्या हिताचे आहे, पुढील काळात शेतकर्‍यांची भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे, भांडवलदार व बडे व्यावसायिक यांचा अप्रत्यक्ष मार्गच सरकारने खुला केलेला आहे. पंजाब व हरियाणा मधील शेतकरी कोट्यवधी स्वरूपात रस्त्यावर उतरले आहेत, परंतु सरकार लाठीचार, दडपशाही खोटे गुन्हे नोंदवून, सरकार हे आंदोलन दाबत आहे.

सदर विधेयकाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी नवीन करत असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, परंतु निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारची मक्तेदारी निर्माण होणार आहे. तसेच यापूर्वीही शेतकरी मार्केट बाहेर आपल्या शेती मालाची विक्री करतच होते, पण कोणताही विचार न करता काही तरी नवीन बिनकामाचे उद्योग करत केंद्र सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्वच संपवून टाकत आहे, त्यामुळे नियंत्रण संपणार आहे.

कंत्राटी शेती यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे, सदर तीनही विधेयके केंद्र सरकारने संख्याबळाच्या जोरावर रेटून बेकायदेशीरपणे पास करून घेतली आहेत. खरतर हमी भाव व स्वामिनाथन आयोग या गोष्टी महत्त्वाच्या असताना भांडवलदारांच्या हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सदर विधेयक शेती आणि शेतकरी यांच्या विरोधातील असून सदर विधेयकास आम्ही शेतकर्‍यांची मुलं-मुली छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने विरोध करतो व केंद्र सरकारचा या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करतो, केंद्र सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे. अन्यथा छात्रभारतीच्यावतीने लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. निशाताई शिवुरकर, अ‍ॅड. नईम इनामदार, हिरालाल पगडाल, छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्यध्यक्ष तुषार पानसरे, प्रशांत काकड यांनी आंदोलनात भूमिका मांडली.

तालुकाध्यक्ष राधेश्याम थिटमे, तृप्ती जोर्वेकर, गणेश जोंधळे, सागर गुंजाळ, दीपाली कदारे, राहुल जर्‍हाड, हर्षल कोकणे, संदीप आखाडे, शीतल रोकडे आदी छात्रभारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com