धनादेश वटला नाही; महिलेस 1 महिना कारावास व साडेपाच लाख रुपये दंडाची शिक्षा

धनादेश वटला नाही; महिलेस 1 महिना 
कारावास व साडेपाच लाख रुपये दंडाची शिक्षा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात उसनवार म्हणून घेतलेल्या पैशाचा व्यवहार पूर्ण केला नाही व दिलेला 5 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश न वटवता मागे पाठवून फसवणूक केल्याप्रकरणी एक़ास जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी 1 महिना कारावास व 5 लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात वृंदा शिरिष ठाकुर हिने अनिल राजू शिंदे यांचेकडून उसनवार रक्कम म्हणून 5 लाख 50 हजार रुपये घेतले होते. सदर व्यवहार पूर्ण न झाल्याने वृंदा शिरिष ठाकुर हिने नमूद रक्कम अनिल राजू शिंदे यास न देता रक्कम . 5,50,000 रुपयांचा धनादेश दिला होता. तो न वटल्याने अनिल राजू शिंदे यांनी वृंदा शिरिष ठाकुर, रा. वॉर्ड नंबर 1. दशमेशनगर, धस हॉस्पिटल जवळ, श्रीरामपूर हिचे विरुध्द न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. सदर खटल्यात फिर्यादीने मा. कोर्टात आरोपी वृंदा शिरिष ठाकुर हिने केलेल्या फसवणुकीबाबत सक्षम पुरावे व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरला.

या खटल्यात श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी वृंदा शिरिष ठाकुर रा. वॉर्ड नंबर 1. दशमेशनगर, धस हॉस्पिटल जवळ, श्रीरामपूर हिस धनादेश न वटल्या प्रकरणी 1 महीने कारावास व 5 लाख 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुध्द दाखल अपिलात सदरची शिक्षा नुकतीच जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी कायम केली आहे.

याप्रकरणी फिर्यादीचे वतीने अ‍ॅड. तुषार बी. आदिक, अ‍ॅड. सुशिल अ. पांडे, अ‍ॅड. वैभव व्ही. गुगळे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com