धनादेश न वटल्याने 9 लाखाचा दंड

धनादेश न वटल्याने 9 लाखाचा दंड

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने संशयितास 9 लाख रुपये दंड व दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. श्रीगोंदा येथिल कंत्राटदार व्यवसायिक जी. के. कन्सट्रक्शनचे भाऊसाहेब खेतमाळीस यांनी त्यांच्या मालकीची वाहने संशयित राजेंद्र कांबळे (रा. वाळुंज एमआयडीसी औरंगाबाद) यांना भाडे तत्वावर वापरासाठी दिली होती.

कांबळे यांनी वाहनांच्या भाड्याच्या रक्कम देण्यासाठी खेतमाळीस यांना चार लाख 50 हजार रूपयांचा धनादेश दिला होता. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने हा धनादेश वटला नव्हता. त्यामुळे खेतमाळीस यांनी श्रीगोंदा येथील न्यायालयात फिर्यादी दाखल केलेली होती. या खटल्यात न्यायालयाने दोन्ही बाजू एैकून कांबळे यांना दोषी धरुन 9 लाख रूपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com