स्वस्त धान्य वाहतूक प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्वस्त धान्य वाहतूक प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी संशयास्पद स्वस्त धान्य वाहतूक करणारी चार वाहने काल ताब्यात घेतले होती. दरम्यान तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी पत्रव्यवहार करुनही तब्बल चोवीस तासांनंतरही त्यांचे कोणतेही उत्तर न आल्याने राजूर पोलिसांनी शासकीय योजनेतील जीवनावश्यक गहू व तांदूळ बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आले म्हणून चार जणांविरोधात अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 3 (1), 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून जवळपास 53 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान संगमनेर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी काल राजूर येथे भेट दिली व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.

तालुक्यातील राजूर पोलीस ठाणे समोरच पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, हेड कॉन्स्टेबल देविदास भडकवार यांनी पोलीस ठाण्यासमोर या गाड्याची तपासणी करत असतानाच रेशनिंगचे धान्य भरलेले चार ट्रक तपासणी करून ताब्यात घेतल्या होत्या.

दरम्यान स्वतः माजी आमदार वैभव पिचड यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला व थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली. अखेर महसूल यंंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस कॉ. विजय सदाशिव फटांगरे यांनी राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्ह्यात वापरलेली वाहने एम. एच. 04 ई वाय. 5291, एम. एच. 15 -9057, एम. एच. 17 एजी 3883, एम. एच. 17 टी 2900 त्यात गहू व तांदळाच्या गोण्या. एकूण-56,13,50 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी आरोपी हौशीराम दिनकर देशमुख रा. केळुंगण ता. अकोले, साई संदेश धुमाळ रा. धुमाळवाडी, ता. अकोले, योगेश राजेंद्र धुमाळ, रा. अकोले व अशोक हिरामण देशमुख रा. केळुंगण, ता. अकोले यांनी वर नमूद शासकीय योजनेतील जीवनावश्यक गहू व तांदळाच्या गोण्या बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आले म्हणून अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 3 (1), 7 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्क पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com