स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी त्वरीत सोडवा

स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी त्वरीत सोडवा

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनचे तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शासकीय गोदामातून शासनाच्या विविध योजनेचे धान्य लाभार्थिंना वितरण करत असताना धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून पर्यायी लाभार्थी व धान्य दुकानदारांचे वाद सुरु आहे. या अडचणींसह स्वस्त धान्य दुकानाच्या ई-पॉझ मशिनवर येणार्‍या अडचणी तातडीने सोडवाव्यात, आदी मागण्यांचे निवेदन ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरशनच्यावतीने तहसीदारांना देण्यात आले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय गोदामातून ज्या महिन्याचे वितरण स्वस्त धान्य दुकानदारास होत आहे त्या महिन्याचे ई-पॉझ मशिनवर धान्य वितरणासाठी उपलब्ध झाले पाहिजे. तालुक्यातील वितरण हे 4 महिन्याने (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर) उशिराने चालु आहे. तरी आपण ते वाहतूक ठेकेदारांना सुचना देऊन मुदतीत धान्य वितरणासाठी उलपब्ध करुन देण्याची सूचना करावी.

शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानास वितरण झाल्यास ते इ-पॉझ मशिनवर त्याच दिवशी अपलोड करुन देण्याची आपण सूचना द्यावी. सदर महिन्यात दिपावलीच्या सणामुळे शासनाने आनंद शिधा वाटप ऑफ लाईन केले परंतु ई-पॉझ मशिनवर रेग्युलर धान्य वितरण करण्यास खुपच अडचण येत असल्याने यामहिन्यात 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत धान्य वाटपास मुदतवाढ मिळावी. त्यामुळे लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही.

वरील मागण्यांची पूर्तता करुन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाच्या ई-पॉझ मशिनवर येणार्‍या अडचणी त्वरीत सोडविण्यात याव्यात, अशी मागणी या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरशचे तालुकाध्यक्ष माणिकराव जाधव, शिवाजीराव सैद, प्रसिध्दी प्रमुख मंगेश छतवाणी, राहुल पगारे, सी. बी. गायकवाड, ए. पी. झिरंगे, प्रेमकुमार छतवाणी, संतोष वेताळ, नरेंद्र खरात, आर. जी. काळे, दिलीप त्रिभूवन, सोमनाथ देवकर, एन. एस. गंगवाल, पी. बी. छतवाणी, लक्ष्मणराव खंडागळे, विजय म्हस्के, विजय वैराळ, राहुल पगारे आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com