स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू - कळकुंभे

स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू - कळकुंभे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप फेडरेशनच्या जिल्हा कार्याध्यक्षा मीनाताई कळकुंभे यांनी दिले.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप फेडरेशनच्या श्रीरामपूर शाखेची बैठक फेडरेशनच्या जिल्हा कार्याध्यक्षा मीनाताई कळकुंभे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे तसेच खंडाळा स्वस्त धान्य दुकानदार सुभाष साळुंके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्या म्हणाल्या, तुम्ही मला संघटनेचे सभासद होऊन ताकद द्या, मी तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच ई-पॉज मशिनबाबत ज्या अडचणी असतील त्या शासनदरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करीन. दुकानदारांनी जे मोफत धान्य वितरण केले त्याचे कमिनशनबाबत शासनाशी चर्चा करू, अशी ग्वाही दिली.

यावेळी तालुकाध्यक्ष माणिक जाधव, नरेंद्र खरात, शिवाजी सैद, सोमनाथ देवकर, कैलास भणगे, चंद्रकांत गायकवाड, अजिमभाई पठाण, दिलिप त्रिभुवन यांनी विचार मांडले. यावेळी मंगेश छतवाणी, अरुण खंडागळे, राजेंद्र वाघ, सलाम शेख, ई-पॉज मशिनचे ऑपरेटर राहुल म्हस्के, धनंजय झिरंगे, विजय म्हस्के, गोपाल लिंगायत, सोमनाथ देवकर, संतोष वेताळ, प्रशांत भागवत, दिलीप त्रिभुवन, शांताराम बकरे, किरण काळे, मिनाक्षी कळकुंभे, पोपटराव पाखरे, अशोक औटी, पुंजा बडे, सुधाकर नजन, संजय मरकड आदी उपस्थित होते. नरेंद्र खरात यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com